लोकसभा २०१९: भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी , कोण देणार खैरेंना टक्कर?

Foto


औरंगाबाद- आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आजपर्यंत शिवसेना-भाजप युतीचा गड राहिला आहे. पण अलिकडच्या काळात युतीत दरी निर्माण झाल्याने भाजपने सेनेला शह देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी खा. जयसिंगराव गायकवाड आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

 

गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना- भाजप युतीचे खा. चंद्रकांत खैरे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. पण गेल्या चार-साडेचार वर्षांपासून सेना- भाजप युतीत गल्‍लीपासून ते दिल्‍लीपर्यंत धुसफूस सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत शिवसेना आहे. पण दोन्ही पक्षात पूर्वीप्रमाणे संबंध राहिलेले नाही. त्यामुळे सेनेचे नेतृत्व भाजपवर नाराज आहे. ही नाराजी त्यांनी नियमितपणे त्यांच्या मुखपत्रातून टीका करून व्यक्‍त केली आहे. गतवर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात तर भाजपाशी जाहीर फारकत घेत यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपने सेनेच्या नेतृत्वाशी युतीबाबत अनेक वेळा जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण सेनेने प्रतिसाद दिला नसल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे, असे असताना ऐनवेळी अडचण निर्माण होऊ नये यासाठी भाजपने राज्यातील सर्व 48 जागांवर निवडणूक तयारी सुरू केली आहे.

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे. या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे काम सध्या विरोधी पक्षासह मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही सुरू केले आहे. बुथपातळीवर कार्यकर्त्यांची नियुक्‍ती केलेली आहे. भाजपकडून लोकसभेसाठी माजी महापौर डॉ. भागवत कराड, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खा.जयसिंगराव गायकवाड व महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर हे सर्वजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेस आणि सेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना टक्‍कर देणारा उमेदवार पक्षातर्फे निवडला जाणार आहे.

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker